शिर्डी प्रतिनिधी : गणेश कुंभकर्ण 

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालांची प्रतीक्षा लागलेली असतानाच, दाक्षिणात्य सुपरस्टार आणि 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) पक्षाचे सर्वेसर्वा थलापती विजय यांनी आज शिर्डी येथे जाऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. राजकीय प्रवासातील पहिल्या मोठ्या परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी विजय यांनी साईचरणी नतमस्तक होत विजयासाठी साकडे घातले. ​साईबाबांच्या मध्यान्ह आरतीनंतर विजय यांनी समाधीचे दर्शन घेतले. 



 त्यांच्या शिर्डी भेटीची बातमी समजताच चाहत्यांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. ​दर्शन घेतल्यांनतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने थलापती विजय यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी विजय यांना शाल व मूर्ती देऊन सन्मानित केले. ​याप्रसंगी संस्थानचे इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते, ज्यात प्रामुख्याने ​भिमराज दराडे (उप मुख्य कार्यकारी अधिकारी),​विष्णू थोरात (मंदिर प्रमुख) ,​दीपक लोखंडे (जनसंपर्क अधिकारी) ​तामिळनाडूच्या राजकारणात 'थलापती' विजय यांचा हा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी घेतलेली ही आध्यात्मिक भेट सध्या सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.


Post a Comment

Previous Post Next Post