कोल्हार वार्ताहर - ( पत्रकार गणेश कुंभकर्ण) लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा हायस्कूल कोल्हार या सीबीएसई शाळेमध्ये आज आंतरशालेय राष्ट्रभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा पार पडल्या .कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री विखे पाटील सैनिक स्कूलचे कमांडट कर्नलशेखर जोशी ,दैनिक सकाळचे पत्रकार श्री सुहास वैद्य,दैनिक पुढारीचे पत्रकार श्री प्रमोद कुंभकर्ण ,दैनिक सार्वमत चे पत्रकार श्रीसंजय कोळसे तसेच दैनिक दिव्य मराठीचे पत्रकार श्री सुभाष कोंडेकर उपस्थित होते. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेअंतर्गत येणाऱ्या विविध माध्यमिक विद्यालयातील106 विद्यार्थ्यांनी समूह गीत गायन स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला. स्पर्धेसाठी राष्ट्रभक्तीपर गीते या विषयाची निवड करण्यात आली होती .सर्व शाळांच्या समूहांनी देशभक्ती वरील ऐतिहासिक तसेच सद्यस्थितीतील गीतांचे सादरीकरण केले .याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शेखर जोशी यांनी संगीताचे मनुष्य जीवनातील महत्त्व विद्यार्थ्यांना विशद करून सांगताना संगीत जीवनातील अनेक दुःखातून बाहेर पडण्यासाठी एक उत्तम उपाय आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने आयुष्य सुखकर करण्यासाठी संगीताचा आधार घ्यावा .बाल वयामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचे कौशल्य प्राप्त करणे जरुरीचे असते. संगीत या विषयात देखील विद्यार्थी आपले करिअर करू शकतात .मनुष्य जीवनाला आनंदी बनवण्यासाठी सुमधुर अशा गीतांची उपलब्धता आहे आणि हे सुमधुर गीते मनुष्यास आपल्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून बाहेर येण्यासाठी विरंगुळा म्हणून अतिशय महत्त्वाची भूमिका निभावतात .याप्रसंगी पत्रकार संजय कोळसे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले .त्यांनी सांगितले की प्प्रवारा ग्रामीण शिक्षण संस्थेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी गणेश उत्सवासारख्या कार्यक्रमातून उत्तम असे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेले आहे आणि त्याचा ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांनी उपयोग करून घेतला. या विद्यार्थ्यांमध्ये राज्य आणि देश पातळीवर गुण दाखवण्याचे सामर्थ्य असल्याचे देखील त्यांनी यावेळी नमूद केले. दैनिक सकाळचे पत्रकार सुहास वैद्य यांनी आपल्या देशातील शास्त्रीय संगीताचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा .त्याचप्रमाणे शास्त्रीय संगीत हे जगातील श्रेष्ठ असे कौशल्य असून पाश्चात्य संगीताचा आपल्या देशातील पारंपारिक संगीतावर अतिक्रमण होत असल्याचा दाखला त्यांनी दिला. बिबस्त आशा , पाश्चात्य संगीताच्या ऐवजी आपल्याला कर्ण मधुर वाटतील अशा लाखो गाण्यांची लता मंगेशकर यांच्यासारख्या गायकांनी देणगी दिली असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्राचार्य सुधीर मोरे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देऊन सर्वांचे स्वागत केले .श्री निंबाळकर डी.बी आणि श्री शेंडे एस के यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले तर सूत्रसंचालन श्री एस बी आव्हाड आणि एडी म्हस्के यांनी केले .आभार प्रदर्शन श्री जाटे एस जी यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post