कोल्हार वार्ताहर : साईप्रसाद कुंभकर्ण 
 पद्मश्री विखे पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय प्रवरानगर येथे दिनांक 8 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री-पुरुष समानतेसाठी नवकल्पना आणि तंत्रज्ञान या विषयावर महिला सक्षमीकरण कक्षाच्या अंतर्गत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले सदर रॅली ही महाविद्यालयातून लोणी गावांमध्ये काढण्यात आली या रॅलीमध्ये स्त्री पुरुष समानतेसाठी विविध घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या व लोणी खुर्द येथील ग्रामस्थांमध्ये याविषयी संबंधी जनजागृती केली. या रॅलीमध्ये महाविद्यालयाचे बहुसंख्य विद्यार्थी त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी एनसीसीचे विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी होत्या तसेच सर्व महिला प्राध्यापिका सहभागी होत्या. या रॅलीचे आयोजन महिला सक्षमीकरण कक्षाच्या अध्यक्ष डॉ.कल्पना पलघडमल यांनी केले राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.बाळासाहेब मुंढे, प्रा. दशरथ खेमनर एन.सी.सी विभाग प्रमुख डॉ.राजेंद्र पवार, डॉ. विजय खर्डे रॅलीमध्ये सहभागी होते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एम दिघे सर ,उपप्राचार्य डॉ.आर.जी.रसाळ ,डॉ.बी.डी. रणपिसे, डॉ.अनिल वाबळे, प्रा.छाया गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली रॅली उत्साहात पार पडली. त्यानंतर दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांसाठी मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. व फनी गेम्स म्युझिकल चेअर इत्यादीचे ही आयोजन करण्यात आले. महिला प्राध्यापिकांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला त्याचबरोबर आहार व आरोग्य या विषयावर आरोग्य सल्लागार समीना पठाण यांचे व्याख्यान महिला प्राध्यापिकांसाठी आयोजित करण्यात आले आणि या व्याख्यानासाठी उपस्थित महिला प्राध्यापिकांचे हाईट वेट, रेस्टिंग मेटाबोलिझम बॉडी फॅट, बी.एम. आय इंडेक्स इत्यादी हेल्थ पॅरामीटर्स तपासण्यात आले व त्यावरून महिलांनी आपला आहार कसा घ्यायला पाहिजे व त्यामुळे त्यांचे आरोग्य कसे सुदृढ राहील यासंबंधीचे मार्गदर्शन करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post