कोल्हार (वार्ताहर )- साईप्रसाद कुंभकर्ण
कोल्हार येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली याबाबत सविस्तर असे की कोल्हार लोणी रोड वर खर्डे वस्ती (काळामळा )येथील भाऊसाहेब मारुती खर्डे यांची रोड लगत वस्ती आहे व या वस्तीपासून 100 फूटा च्या अंतरावर तार कंपाउंड ने बंदिस्त केलेला गाईचा गोठा आहे शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने या गोठ्यात या कंपाउंडच्या जाळी खालील माती उकरून जाळी जवळ बांधलेल्या दोन शेळ्यां वर हल्ला करीत शेळ्यांना ठार मारले यातील एक शेळी व्यालेली होती या शेळी ची बकरे मात्र या बिबट्याच्या हल्यापासुन बचावली
शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास खर्डे यांच्या गोठ्यातील गाई व शेळ्यांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने खर्डे परिवारातील काही सदस्य जागे झाले व गोठ्याकडे गेले असता त्यांना दोन शेळ्या मृतावस्थेत पडलेल्या दिसल्या व त्याठिकाणी बिबट्याच्या पंजाचे ठसे नजरेस पडले पहाटे चारच्या दरम्यान कोल्हार - लोणी रस्त्यावर वस्ती नजीकच हा बिबट्या पहाटेच्या सुमारास कामावरून येणाऱ्या व जाणाऱ्या कारखाना कर्मचाऱ्यांना दिसला
बाबासाहेब येवले यांच्या मोटर सायकल ला हा बिबट्या आडवा गेला नितिन भाऊसाहेब खर्डे यांनी सकाळी पत्रकार प्रमोद कुंभकर्ण व साईप्रसाद कुंभकर्ण यांना माहिती दिली
कुंभकर्ण यांनी वन कर्मचारी गोरक्ष सुरासे यांना भ्रमणध्वनी करून घटनेची माहिती दिली वनकर्मचारी गोरख सुरासे व पशु वैद्यकीय डॉक्टर खपके यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी या ठिकाणी पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी नितीन खर्डे व किशोर खर्डे यांनी केले आहे.
Post a Comment