कोल्हार प्रतिनिधी-
दिनांक 19 जानेवारी 2021 रोजी लोणी पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यात आली की फिर्यादीची मुलगी वय वर्ष १७ तिला तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन कशाचे तरी आमिष दाखवून एका अज्ञात इसमाने पळून नेल्याची फिर्याद लोणी पोलीस स्टेशनला दिली होती सदर घटनेचा तपास सहाय्यक फौजदार फटांगरे हे करत असताना सदर गुन्हा हा आरोपी अनिकेत दत्तात्रेय सकट वय वर्ष २० याने सादर मुलीस पळून नेल्याची माहिती मिळाली त्यानंतर सदर आरोपीस मुलीसह मिरजगाव येथून अटक करून लोणी पोलीस स्टेशनला आल्यानंतर पीडित मुलीने तिच्या बरोबर घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला की आरोपी अनिकेत दत्तात्रय सगट याने अत्याचार केला व त्याचे ओळखीचे झालेले मित्र मुन्ना, विकास, चंदन यांनी मला व अनिकेतला दारूपाजून माझ्यावर मुन्ना, विकास व चंदन यांनी आळीपाळीने अत्याचार केला असल्याची माहिती लोणी पोलिसांना दिली सदर गुन्हा सुरत शहरामध्ये घडला असल्यामुळे आरोपी शोधण्यात लोणी पोलिसांना कठोर परिश्रम घ्यावे लागले यामध्ये अटक केलेले आरोपी १)चंदन सत्यदेव यादव २) मोनालाल हीरालाल यादव ३) विकास ओमप्रकाश सिंह सर्व राहणार उत्तर प्रदेश यांना गुजरात मधील विविध ठिकानावरून अटक करण्यात यश आले वरील आरोपीविरुद्ध लोणी पोलीस स्टेशनला भादवि ३६३,३७६ (२)(j)(N),३७६ (ड) यांच्यासह लैंगिक संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ३,४,९ (एल)१०,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कामगिरी ही जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक डॉ दिपाली काळे मॅडम उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली व लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील व पीएसआय एन बी सूर्यवंशी यांच्या सूचनेनुसार सहाय्यक फौजदार फटांगरे पोलीस हेडकॉन्स्टेबल मच्छिंद्र इंगळे पोलीस नाईक दिपक रोकडे होमगार्ड धर्मा शिंदे यांनी वरील आरोपींना गुजरात मधील विविध ठिकाणावरून अटक करण्यात यश मिळाले

Post a Comment

Previous Post Next Post