अहमदनगर प्रतिनिधी- (गणेश कुंभकर्ण)
अहमदनगर जिल्ह्यात आज १८०५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५१ हजार ८०१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.३३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८५८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ९ हजार ८ इतकी झाली आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या:२,५१,८०१
उपचार सुरू असलेले रूग्ण:९००८
मृत्यू:३३३६
एकूण रूग्ण संख्या:२,६४,१४५
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर
आज नगर जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या एक हजाराच्या आतमध्ये
टीम नगरी वार्ता
0
Comments
Post a Comment