राहुरी प्रतिनिधी - (गणेश कुंभकर्ण)
कोविडच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्र सह अ.नगर जिल्ह्यात रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली,महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्यात आला असल्याने अनेक गोर-गरीब,गरजु,गरजवंतांना दोन वेळच्या जेवनाची अडचन निर्माण झाली.
अश्या गोर-गरीब गरजवंतांना चिंचोली येथील सामाजिक कार्यकर्ते अक्षय भोसले,निखिल भोसले ह्या बंधू कडून गहु व तांदुळ याचे वाटप करण्यात आले.
तसेच बारागावनांदुर येथील स्व.श्री.शिवाजीराजे गाडे पा. कोविड सेंटर मधील रुग्णांना सकस आहार मिळावा ह्यासाठी अक्षय भोसले,निखिल भोसले,शुभम सदाफळ,स्वप्निल तांबे,अमोल भोसले यांनी ५०० अंड्यांची मदत जि.प.सदस्य धनराज शिवाजीराजे गाडे पा. यांच्याकडे सुपुर्त केली.
कोविड संकट काळात भोसले बंधु कोविड रुग्णांना अल्प दरात अंम्बुलंस उपलब्ध करुन देत असल्याने यामुळे रुणांना दिलासा मिळत आहे.
Post a Comment