कोल्हार प्रतिनिधी  : सरला बेटाचे मठाधिपती ,महंत रामगिरीजी महाराज यांनी बुधवारी कोल्हार भगवतीपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन कोरोणा प्रतिबंधक लस घेतली. चार वाजता कोल्हार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात महंत रामगिरीजी महाराज यांचे आगमन झाले.

आगमन होताच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय घोलप यांनी महंत रामगिरी यांचे स्वागत केले डॉ. संजय घोलप यांनी रामगिरी यांची ऑनलाईन रजिस्टर नोंदणी केली व नंतर येथील वातानुकूलित असलेल्या लसीकरण कक्षात श्रीमती हेमलता ओहळ यांनी महंत रामगिरी महाराज यांना कोरोना प्रतिबंधक लस दिली. नंतर डॉ संजय घोलप यांनी लसीकरणानंतर महंत रामगिरी महाराजांना देखभाल कक्षात ठेवले. 

तिथे रामगिरी महाराज यांनी दहा मिनिटे विश्रांती घेतली व नंतर प्रस्थान ठेवले. लसीकरणानंतर लोकमंथन शी बोलताना महंत रामगिरीजी महाराज म्हणाले की सध्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.

 सरकारने यावर प्रतिबंध वॅक्सिंग काढले. वैज्ञानिकानी यासाठी खूप कष्ट घेतले मी लस घेतली. प्रत्येकाने निरोगी राहावे या महामारी पासून बचाव होण्यासाठी सर्वांनी ही लस घ्यावी असे आव्हान केले. यावेळी मधु महाराज कडलग, पत्रकार प्रमोद कुंभकर्ण, डॉ. दीपक म्हस्के ,सुरेश राका ,डॉ. भणगडे, डॉ .पारखे ,डॉ. निर्मल, औषध निर्माण अधिकारी त्रिभुवन ,राजभोज ,वाघताई ,जालिंदर खर्डे ,संजय पवार ,मेजर पवार आदी उपस्थित होते.






Post a Comment

Previous Post Next Post