अमरावती प्रतिनिधी -

 अमरावती मनपा स्थायी समिती सभापतीपदी  भाजपाचे  सचीन रासने  यांची गुरुवारी निवड झाली.मनपाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात गुरुवारी सकाळी ११ वाजता स्थायी समिती सभापती पदाची निवडणुक घेण्यात आली.

या निवडणूकीत भाजपाचे रासने यांना नऊ मते प्राप्त झाली.प्रतिस्पर्धी अफजल हुसेन मुबारक हुसेन यांना सहा मते मिळाली.या निवडणूकीत सोळा सदस्यांपैकी पंधरा सदस्यांनी सहभाग घेतला तर एक सदस्य अनुपस्थित होते

\.या निवडणूकीत पिटासिन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी  शैलेश नवाल यांनी काम पाहीले.सचिन  रासने यांच्या निवडीबद्दल संपुर्ण महाराष्ट्रातील  कासार समाजाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





Post a Comment

Previous Post Next Post