कोल्हार :- साईप्रसाद कुंभकर्ण

 अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गुहा येथील श्री कानिफनाथ महाराज यांच्या यात्रोत्सवाला 2 मार्च रोजी होळी पेटवून यात्रोत्सवाला प्रारंभ करण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी 6 वा.वाजत गाजत गावातून मिरवणूक काढत मंदिरासमोर गुहा ग्रामस्थ कानिफनाथ फक्त परिवार वतीने मानाची होळी पेटवण्यात आली. त्यानंतर मोठ्या उत्साहात महाआरती करण्यात आली. मंगळवार दि. 3 मार्च रोजी सकाळी कानिफनाथ मंदिर समोरील प्रांगणात ग्रामस्थांच्या वतीने यात्रा कमिटी स्थापन करण्यात आली. या यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी रामा बर्डे तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब कोळसे यांची निवड करण्यात आली. यावेळी प्रेरणा मल्टिस्टेटचे चेअरमन सुजित वाबळे, डॉ तनपुरेचे संचालक अशोक उहें, चैतन्य पतसंस्थाचे चेअरमन प्रमोद कोळसे, कानिफनाथ ट्रस्टचे अध्यक्ष नंदु सौदागर, अविनाश ओहोळ शिवाजी मांजरे, अनिल सौदागर, शरद वाबळे, विजय वाबळे, कैलास कोळसे, मच्छिंद्र आंबेकर, हरी कोळसे, अतुल कोळसे, नाना चंद्रे, बाबासाहेब कोळसे,रविराज डौले यावेळी उपस्थित होते. या यात्रोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कानिफनाथ महाराज यांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन कानिफनाथ महाराज देवस्थान, यात्रोत्स कमिटी व ग्रामस्थांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post