गोवंशाची कत्तल करणाऱ्या टोळीवर लोणी पोलिसांनी मोठी कारवाई केलीआहे. ममदापूर शिवारात केलेल्या या छाप्यात पोलिसांनी ७ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दि. २ मार्च २०२६ रोजी ममदापूर गावातील रेहान महंमद अय्याज कुरेशी याच्या घराशेजारील पत्राशेडमध्ये गोवंशाची कत्तल सुरू होती. या माहितीच्या आधारे लोणी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी धाड टाकली.
पोलिसांनी घटनास्थळावरून
१,६०,००० रुपये किमतीची जिवंत गोवंश जातीची जनावरांचे
सुमारे ८०० किलो वजनाचे गोमांस.
५,६०,००० रुपये किमतीची एक 'इनोव्हा' कार (क्र. MH-04-DJ-8129), ज्यामध्ये ३०० किलो गोमांस भरलेले होते.सदर मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी रेहान महंमद अय्याज कुरेशी, महंमद अय्याज कुरेशी आणि इतर दोन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीचे तीन साथीदार फरार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २७१, ३२५, ३५१(२), ३५१(३), ३(५) आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ च्या कलम ५, ९ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाकचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये लोणी पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक कैलास वाघ, पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी, पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब सांगळे व त्यांच्या पथकाचा समावेश होता.
Post a Comment