शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान च्या श्री साईबाबा हॉस्पिटल शिर्डी मध्ये कार्यरत मॅक्सिलोफेशियल सर्जन डॉ.किरण खांदे गेली २० वर्षे श्री.साईबाबा संस्थान रुग्णालयातील दंत विभागात कार्यरत आहेत. त्यांच्या अनुभव आणि कौशल्यामुळे अनेक रुग्णांना नवजीवन लाभले आहे.मागील सहा महिन्यांच्या कालावधीत डॉ.खांदे यांनी अपघातांमध्ये जबडा तुटलेल्या १०० हून अधिक रुग्णांवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया केल्या आहेत. विशेषतः हेल्मेट न घातल्यामुळे होणाऱ्या अपघातांत डोक्याबरोबरच तोंड व जबड्याला गंभीर दुखापत होते. अशा वेळी जबड्याचे हाड तुटल्याने रुग्णांना खाणे-पिणेही कठीण होते. अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीत डॉ. खांदे यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जबडे पुन्हा व्यवस्थित जोडून रुग्णांना दिलासा दिला आहे.
या सर्व महागड्या शस्त्रक्रिया महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आल्या. या शस्त्रक्रियांचा एकूण खर्च सुमारे ५० लाख रुपयांच्या आसपास असल्याची माहिती त्यांनी दिली.
अक्कलदाढीचे जटिल ऑपरेशन
जबड्याच्या हाडातील गाठींची शस्त्रक्रिया तोंडाच्या कॅन्सरचे निदान व उपचार अपघातग्रस्तांच्या जबड्यांच्या पुनर्बांधणी शस्त्रक्रिया
डॉ.किरण खांदे यांच्या या उल्लेखनीय कार्यामुळे श्री साईबाबा हॉस्पिटल शिर्डीची आरोग्यसेवा अधिक सक्षम व विश्वासार्ह ठरत आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर (भा प्र से )उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराव दराडे, वैद्यकीय संचालक लेफ्ट कर्नल डॉ शैलेश ओक ,उपवैद्यकीय संचालक डॉ प्रीतम वडगावे यांनी अभिनंदन केले आहे.
श्री.साईबाबा हॉस्पिटल शिर्डी येथे कोल्हारचे सुपुत्र डॉ.किरण खांदे यांची उल्लेखनीय कामगिरी
टीम नगरी वार्ता
0
Comments
Post a Comment