याशिवाय स्वयंसेवकांनी मतदार जनजागृती रॅली काढून लोकशाही प्रक्रियेबाबत जागृती केली. विविध सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
या शिबिरात डॉ. बी. एफ. मुंढे , डॉ. विजय निर्मळ ,कवी यशवंत पुलाटे, डॉ. रामनाथ पवार,डॉ. शांताराम चौधरी , डॉ. अनिल वाबळे , डॉ. शिवाजी अनारथे ,डॉ. भगवत उफाडे डॉ. अनिल गाढवे आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील सरपंच लक्ष्मी भाऊसाहेब वाकचौरे, उपसरपंच मीनाक्षी ताई वदक, सामाजिक कार्यकर्ते विजयराव डेंगळे तसेच तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दत्तात्रय तळोले यांनी सहकार्य केले. या शिबिराला मार्गदर्शन ,प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुष्मिता विखे पाटील तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.रामनाथ पवार यांनी केले.
या कार्यक्रमाचे अधिकारी म्हणून डॉ. बी. एफ. मुंढे व डॉ. व्ही. डी. निर्मळ यांनी काम पाहिले. शिबिर यशस्वी करण्यासाठी समिती सदस्य डॉ. लामखेडे मॅडम, डॉ. सुनंदा तळोले, डॉ जयश्री विखे, डॉ व्ही बी तुपे, प्रा चितळकर मॅडम, प्रा शेटे सर, डॉ. लक्ष्मण घोटेकर व डॉ.प्रसाद डागवाले यांनी विशेष परिश्रम घेतले.
Post a Comment