कोल्हार :- 
लोणी येथील पद्मश्री विखे पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा.शेखर ब्राह्मणे , व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राम पवार होते.या कार्यक्रमाला प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर प्रा. ब्राह्मणे यांनी व्यख्यानात बाबासाहेबांचे कार्य व विचार सांगितले . प्राचार्य डॉ.राम पवार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजच्या तरुणांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहेत. शिक्षण, समता आणि सामाजिक न्याय यांचा संदेश त्यांनी दिला असून, तो प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आचरणात आणणे गरजेचे आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले. यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राधवणे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉ.राम पवार यांनी करून दिला तर आभार प्रदर्शन प्रा.जयप्रकाश परदेशी यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post