कोल्हार( वार्ताहर )- संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र कासारे येथील कालिका देवी चा यात्रा उत्सव मिती चरित्र शुद्ध पंचमी सोमवार दिनांक 23 /3/2026 रोजी संपन्न होणार असल्याची माहिती कालिका देवी मंदिर ट्रस्ट विश्वस्तांच्या वतीने देण्यात आली आहे. यात्रा उत्सवानिमित्त सोमवारी सकाळी आठ ते दहा या वेळेत कालिकादेवी अभिषेक पूजा व आरती. सकाळी दहा ते बारा या वेळेत पोळ आरत्या, सकाळी 11 ते 12 या वेळेत राहता व संगमनेर तालुक्यातील महिला मंडळाचेसामुदायिक सप्तशती पाठ वाचन.'दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी कालिकादेवी मंदिर ट्रस्टचे सर्व विश्वस्त, उपस्थित मान्यवर व यात्रा उत्सव सदस्य यांच्या शुभहस्ते कालिका देवीची महाआरती संपन्न होईल 12:30 ते 1:15 अन्नदाते व मान्यवरांचा सत्कार दुपारी1: 15 ते 1:30 मानवता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान समारंभ दुपारी 1:30 ते 2:30 उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन दोन तीस ते पाच महिला युवक युतीचा सांस्कृतिक कार्यक्रम दुपारी तीन ते सात महाप्रसाद वाटप रात्री आठ ते आठ पंधरा शोभेचे दारू काम रात्री आठ तीस ते नऊ श्री च्या छबिन्याची सवाद्य मिरवणूक असे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम यात्रा उत्सव निमित्त संपन्न होणार आहे. या यात्रा उत्सवात महाराष्ट्रातील कासार समाज बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कालिका दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन कालिका देवी मंदिर ट्रस्ट विश्वस्त व यात्रा कमिटी यजमान राहता तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post